परंडा ,दि .६: फारुक शेख 

कोरानाचे सावट  आसल्यामूळे घरीच पुजन करून बैल पोळा साजरा करण्यात आले.

कुंभेफळ गावात  शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळा सणावर यंदा कोरोनाचे सावट आसल्याने गावात बैलपोळा, स्पर्धा, मिरवणूक ,शोभायात्रा, न करता कोरोना नियमाचा पालन करीत सर्व शेतकरी बांधवांनी घरीच बैलांची सजावट करून बैलपोळा साजरा करण्यात आला. तसेच
 कुभेफळ गावांमध्ये घरीच पुजन करून बैलपोळा साजरा करण्यात आला.एकीकडे श्रम वाचवण्यासाठी शेतकरी यंत्र शेतीकडे वळले आणि शेतातील जवळपास सर्वच कामे ही ट्रँक्टरच्या साह्याने होऊ लागली.
परिणामी मोठ्या प्रमाणात असणारी बैलांची संख्या कमी झाली. गावा गावांमध्ये काहीच मोजके शेतकऱ्यांकडे बैल जोडी आहे.



खूप मोठ्या प्रमाणात बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यातही कोरोनोचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात  नाराजीचे वातावरण दिसून आले .
 
Top