नळदुर्ग , दि .०६

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे सोमवार (दि. ६) आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेस ग्रामस्थांनी  प्रतिसाद दिला.यावेळी गावातील जवळपास १२९ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आत्तापर्यंत नंदगाव मध्ये 20 टक्के लसीकरण झालेले आहे. 

लसीकरण मोहिमेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सुप्रिया मोकाशे, आरोग्य सेवक डी. जे. जगताप, एम.एफ.पठाण साहेब, आरोग्य सेविका ए.डी. मगर, आशा कार्यकर्त्या लक्ष्मी कोरे, राजश्री सातलगावकर, ललीता कोळी, सुरेखा बिराजदार यावेळी उपस्थित सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी, युवा नेते वैभव पाटील, कल्याण कुलकर्णी परिश्रम घेतला. त्यावेळी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.
 
Top