नळदुर्ग , दि .०६: विलास येडगे 


१९७० ते ८० च्या दशकात शिक्षकांना प्रत्येक गावात मोठा मान सन्मान मिळत होता. त्याकाळी कमी पगार असतानाही शिक्षक जिवतोडुन विद्या ज्ञानाचे काम करीत होते. मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही, अशी खंत निवृत्त शिक्षक वसंतराव अहंकारी यानी व्यक्त केली. रविवार दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नळदुर्ग शहर पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा ग्रुपच्यावतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करुन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. 


दि.५ सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त तसेच विद्यमान शिक्षकांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. नळदुर्ग येथे शहर पत्रकार संघ व मैलारपुर कट्टा ग्रुपच्याच्यावतीने सेवानिवृत्त तसेच विद्यमान शिक्षकांचा नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले होते. सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव अहंकारी, नंदकुमार जोशी तसेच विद्यमान शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले उत्तम बनजगोळे यांचा या कार्यक्रमात सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. 


या कार्यक्रमास नगरसेवक विनायक अहंकारी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे,अमर भाळे आदीजन उपस्थित होते. यावेळी बोलताना वसंतराव अहंकारी यांनी म्हटले की एक काळ होता शिक्षकांना प्रत्येक गावात मोठा मानसन्मान मिळत होता. शिक्षकांचा शब्द कुणीही त्यावेळी खाली पडू देत नव्हते. त्याकाळी शिक्षकांना कमी पगार असतानाही शिक्षक जिवतोडुन विद्या ज्ञानाचे काम करीत होते. त्याकाळी शिक्षकांना साधी सायकल मिळायची नाही. मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही असे का झाले, याचा विचार करण्याची आज गरज आहे. असेही यावेळी वसंतराव अहंकारी यांनी म्हटले. यावेळी नंदकुमार जोशी व उत्तम बणजगोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार संजय जाधव यांनी मानले.
 
Top