जळकोट , दि . २७ : 


राज्यातील बंजारा समाज बांधवानी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्रित येऊन लढा द्यावा असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार  संजय राठोड यांनी केले.


तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच ओबीसी आरक्षण पदोन्नती मधील आरक्षण,नाॅन क्रिमिलेयर सामाजिक, राजकीय विषयांवर संवाद साधण्यासाठी राठोड  हे आले होते.  यावेळी  ते बोलत होते. प्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण  तर व्यासपिठावर बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ.टि.सी. राठोड,  हरिष जाधव, लक्ष्मण चव्हाण, अमृता चव्हाण , माणिक चव्हाण,राजु चव्हाण,  लखण चव्हाण, संजय राठोड,कुमार राठोड,  आदी उपस्थित होते.



यावेळी आमदार संजय राठोड पुढे म्हणाले  की ,उस्मानाबाद जिल्हा तांडा सुधार योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी व भरीव निधी मिळावे तसेच देशात बंजारा समाजाला वेगवेगळ्या संवर्गात टाकले आहे, ते  एकाच संवर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.त्यासाठी सर्वांनी लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले.


कार्यक्रमास गुलाब जाधव , डॉ.सुरज चव्हाण, संदीप राठोड, लक्ष्मण राठोड, संतोष चव्हाण, वसंत पवार, दामाजी राठोड, सुर्यकांत राठोड, शिवाजी पोलीस पाटील, विनायक चव्हाण, डॉ.वाय के चव्हाण, बाबुराव पवार, महादेव राठोड, नेमिनाथ चव्हाण,पांडुरंग चव्हाण,थावरु राठोड, सिताराम राठोड, रामचंद्र पवार, ताराचंद राठोड,शंकर राठोड,  सुभाष नाईक, शिवाजी चव्हाण, गणेश राठोड, देविदास चव्हाण, सुर्यकांत चव्हाण, विनायक राठोड, संतोष चव्हाण, किरण चव्हाण,अमोल चव्हाण कैलास चव्हाण,फुलचंद जाधव, दिनेश राठोड,अनिल राठोड, जगदिश राठोड, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी नाईक यांनी तर आभार लखन चव्हाण यांनी मानले.
 
Top