परंडा, दि . २७ : फारूक शेख
नगरपालिका निवडणुकीसाठी दोन सदस्य प्रभाग रचनेमुळे " कंही खुशी कंही गम " अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत . या रचनेमुळे कोणाचा फायदा कोणाचा तोटा तर काहींची होणार गोची आशी चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे .
आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी दोन सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतला आहे . निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नाही, मात्र परंडयातील राजकीय पक्षाचे नेतेमंडळीं व इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे . कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलले जातील असा अंदाज बांधला जात आहे.
संध्या मात्र कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने निवडणुकांची हालचाली सुरु झाल्या आहेत .
परंड्याच्या राजकारणातील दोन मातब्बर गट आमने सामने येणार असुन दोन्ही गटाची आक्रमकता अजेंड्यावर कोणते विषय असणार ?
दोन्ही गटाकडुन नगरपालिकेच्या १७ सदस्याकरीता ८ प्रभाग ५० टक्के महिला आरक्षण आहे. तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे . आशा परिस्थीतीत नेतेमंडळीनी प्रत्येक प्रभागातुन सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे .
निवडणुक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्था, महानगर पालिका ,नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याबाबत सुचविले आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . निवडणुक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांनी जात प्रमाणपत्र काढुन घेण्याबाबत सांगीतले आहे .
इच्छुकांनी नगरपालिका निवडणुकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगरसेवक होण्यासाठी वार्डातील तरूणांच्या भेटी गाठी घेत आहेत . या निवडणुकीत शहरात घडलेल्या लहान मोठया घटनांचे पडसाद व राजकिय कुरघोडयांमुळे आणि ५० टक्के महिला आरक्षण दोन सदस्य प्रभाग रचनेमुळे होणारी ही निवडणुक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत .
यासाठी सर्वच पक्षांनी आतापासुनच कंबर कसली आहे . येत्या डिसेंबर महिन्यात पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपणार आहे .
पालीकेवर आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षानी शहरातील सर्व प्रभागावर लक्ष केद्रिंत केले आहे . कोण स्वबळावर तर कोण कोणाशी युती, आघाडी करणार का ? हे स्पष्ट झाले नाही.
..
कांही नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार ?
पाच वर्षात बरेच पाणी पुलाखालुन वाहून गेले आहे . नगरसेवकांनी कोणती कामे केली याचा हिशोब मतदार मागणार असुन अकार्यक्षम नगरसेवका बद्दल मतदारात नाराजी आहे . या नगरसेवकांनी पक्षाचे काम देखील केले नाही, उलट पक्षाला कोंडीत पकडण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी देखील त्यांच्यावर नाराज आहे .आशा विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे .
पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या कांही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर कांही नगरसेवक मतभेदामुळे पक्षापासुन दुर गेले असुन ते सत्तेत असुन नसल्यासारखे आहे. ते दुसऱ्या पक्षात उघडपणे गेले नाहीत मात्र ते कुंपणा जवळ गेले आहेत योग्य वेळी ते आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत .