परंडा, दि. २७ :
सिना कोळेगाव धरणातील पाण्याचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सोमवार दि २७ रोजी जलपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते .
परंडा तालुक्यातील सर्वात मोठा असलेला सिना कोळेगाव धरण भरत आला आहे . या धरणातील पाण्याचे पुजन माजी आमदार मोटे यांच्या हस्ते करण्यात आले . यंदा तालुक्यात भरपुर पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्व धरणे भरली आहेत . सीना कोळेगाव धरण ९२ टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरले जाईल असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले .
परंडा तालुक्यात चांगल्या प्रकारची जलसिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतूने निर्माण केलेला हा प्रकल्प आज मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे . त्यामुळे तालुक्यात जलसिंचनाचे क्षेत्र वाढले आहे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे . जल पूजनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड संदीप खोसे पाटील, ,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, पंकज पाटील, भारत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल पाटील, डीसीसी बँकेचे संचालक हनुमंत कोलते पाटील, बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे, भाऊसाहेब नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय मोरे, रवी मोरे, अॕड हरिचंद्र सूर्यवंशी, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापूसाहेब मिस्कीन, नगरसेवक संजय घाडगे, मलिक सय्यद, शरीफ तांबोळी, धर्मराज गटकुळ, अमीर शेख , सोमनाथ साबळे, मीडिया सेल तालुकाध्यक्ष मयूर जाधव, घनश्याम शिंदे, अजय बनसोडे, आदी उपस्थित होते.