काटी, दि. ११ :
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव, पिंपळा (बु), पिंपळा(खु) येथे पंचायत समिती सदस्यांना महाराष्ट्रात संघटन करून ,नागपूर, मुंबई, कराड येथे आंदोलने करून पंचायत समिती सदस्यांना 10 टक्के निधीची तरतूद करणारे महाराष्ट्र राज्य पंचायत समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा तामलवाडी पंचायत समिती गणाचे सदस्य तुळजापूर पं स.चे उपसभापती दत्ता शिंदे यांच्या पंचायत समिती स्तर निधीतून सुरतगाव येथे विठ्ठल मंदिरासमोर पिंपळा खुर्द येथे मुख्य चौक महादेव मंदिरासमोर, पिंपळा बुद्रुक येथे गावातील मुख्य चौक येथे प्रत्येकी एक हायमास्ट लॅम्प उभारण्यात आले आहे.
त्यामुळे झगमगता प्रकाश देणाऱ्या हायमास्ट लॅम्पमुळे सुरतगाव, पिंपळा(बु.),पिंपळा(खु.) येथील मुख्य चौकाला सौंदर्य आले असून चौक हायमास्टने उजाडले आहेत. यापूर्वीही उपसभापती दत्ता शिंदे यांनी पिंपळा खुर्द येथे पंचायत समिती निधीतून त्यांनी बंदीस्त नाली गटारीचे काम केले आहे. मतदार संघातील उर्वरित गावातही दोन महिन्यात पुढील पंचायत समितीचा निधी दिला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.