नळदुर्ग , दि .१७ : 
 मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शुक्रवार दि. १७ सप्टेंबर रोजी शहरातील 
 कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंञी मधुकरराव चव्हाण  यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


प्रारंभी  हुतात्मा बाबूराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष  मधुकरराव चव्हाण   यानी  पुष्पहार अर्पण  केले. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मधुकरराव  चव्हाण , रामचंद्र  आलूरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे, डाॅ.सुभाष राठोड, क्रीडा विभागाचे डॉ. अशोक कांबळे, डॉ. कपिल सोनटक्के, अधिक्षक धनंजय पाटील आदीसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top