तुळजापूर , दि . १७ : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा ( तुळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शुक्रवार दि,१७ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रामराव भोसले यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापक अनंत फुलसुंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच  येथील शाळेचे विद्यार्थी प्रथमेश सुरेश वाघमारे आणि मोहन तानाजी भोसले यांची सैनिकी शाळेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच नेताजी  जाधव, उपसरपंच किरण जाधव, शालेय समिती अध्यक्ष रामराव भोसले, मुख्याध्यापक अनंत फुलसुंदर ,माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय मस्के, ग्रामपंचायत सदस्य विलास भोसले, राहुल जाधव, महादेव भोसले, सुरेश वाघमारे आदींसह पालक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top