नळदुर्ग , दि . १७ : 

 मराठवाडा मूक्ती संग्राम लढाईवेळी सैनिकी कार्यवाही करीत असताना नळदुर्गच्या आलियाबाद पूलाला उडवून देण्याचा रझाकारांचा प्रयत्न होता. पण तो डाव भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.या क्षणांचा मूक साक्षीदार म्हणून आम्ही आलियाबाद पूलाचे वर्षाचे पूजन करतो असे नगरसेवक विनायक अहंकारी यानी बोलताना सांगितले .

नळदुर्ग येथिल महामार्गावर ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे शुक्रवार दि . १७ सप्टेंबर  मराठवाडा मूक्ती संग्राम दिनानिमित्त नगरसेवक विनायक अहंकारी , नितीन कासार यांच्या हास्ते पुजन करण्यात आले. यावेळी विनायक अहंकारी हे बोलत होते. याप्रसंगी हुतात्म्याना आदराजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर , नगरसेवक विनायक अहंकारी , नितीन कासार , बसवराज धरणे , महालिंग स्वामी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते  बंडु कसेकर , सामाजिक कार्यकर्ते  संजय  विठ्ठल जाधव, सन्नी भुमकर , पञकार  सुहास येडगे , विलास येडगे , तानाजी जाधव ,शिवाजी नाईक  उत्तम बणजगोळे , दादासाहेब बनसोडे , अमर भाळे  , महेंद्र  डुकरे,  अय्युब शेख , आनिल जाधव आदी उपस्थित होते.
 
Top