आज दि .१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.
यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकास पालकमंत्री तसेच इतर उपस्थित मान्यवरांनी अर्पण करून अभिवादन केले . हवेत बंदुकीची फायरिंग करुन मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्राम संबंधी पुस्तकं प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचे आणि शेतकरी मदत केंद्राचे पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .