जळकोट, दि. १७: मेघराज किलजे
       
तुळजापूर तालुक्यातील केंद्र होर्टी अंतर्गत असणाऱ्या जळकोटवाडी (नळ) ता . तुळजापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व गुणवत्ता वाढावी .यासाठी जि. प. प्रा. शाळा, जळकोटवाडी (नळ) येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गावचे सरपंच  शिवाजीराव कदम , ग्रा. पं.सदस्य  नागनाथ साळुंके ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  नागनाथ पवार, शाळेचे मुख्याध्यापक  उमेश भोसले , शिक्षक  अशोक राठोड , माजी सैनिक  लहू  कदम , शिवाजी वागदरे, गुणवंत गुळवे  बंडू लष्करे,  जामवंत कदम  व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top