इटकळ , दि .३० :
तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील मुख्याध्यापक काशिनाथ देडे यांनी ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रेश्मा घंटे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी डॉ वाय के चव्हाण, इटकळ बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी तात्याराव माळी, नळदुर्ग केंद्राचे केंद्र प्रमुख दत्तात्रय आलुरे,माजी सरपंच कल्याणराव पाटू, उपसरपंच जाकीर शेख,धनगरवाडीचे उपसरपंच राम कदम, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अश्वीनी जळकोटे, मुख्याध्यापक शिवशंकर जळकोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदिप हुकीरे, शिवाजी चव्हाण, पोलिस पाटील सुजाता स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर साखरे गुरुजी प्रतिष्ठान,शिवा बिराजदार मित्रमंडळ,शालेय व्यवस्थापन समिती, इटकळ बिट,चव्हाणवाडी ग्रामस्थ व केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक काशिनाथ देडे यांचा सन्मान करण्यात आला.
सत्कारानंतर शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रात शिक्षक, विद्यार्थी, प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ भालके यांनी , सुत्रसंचलन स्वामी यांनी तर आभार विजय सदाफुले यांनी मानले. यावेळी अणदूर, इटकळ, केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.