नळदुर्ग, दि .३० : सुहास येडगे 

 शहरातील  मराठा गल्लीतील रस्त्याचे  काम     नगरपालिकेने आदयाप ही सुरु न  केल्याने शिवशाही मंडळाच्या वतीने नगपालिकेवर बोंब ठोको मोर्चा शुक्रवार दि .१ आॕक्टोंबर रोजी सकाळी  ११ वाजता काढण्यात येणार आहे.

 
निवेदनात पुढे नमुद केले आहे की,  गेल्या तीन वर्षा पासून मराठा गल्लीतील रस्ता पूर्ण पणे उखडून गेला आहे, दरम्यान पॉचपिर चौकापासून मराठा गल्ली पर्यंतचा रस्ता जाणीवपूर्वक पालिकेने न करता तो तसचा ठेवला आहे, याचाच परिणाम पावसाळयामध्ये या रस्त्याने चालताना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मोठया प्रमाणात रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने या रस्त्यावरुन चालता ही येत नाही किंवा मोटार सायकल ही चालविता येत नाही. शिवाय वयस्कर माणसे या रस्त्यावरुन चालताना पडल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तर ज्ञानेश्वरी पारायणा मध्ये पालखी घेवून ही या रस्त्यावरुन पडले आहेत. 

गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात पालखी कधी पडली नव्हती. त्याच बरोबर पारायण कटटयासमोर ही मोठया प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुरुम टाकून रडक्याचे डोळे पुसल्यागत प्रकार पालिकेकडून गेल्या दोन वर्षापूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक ही जाणीवपूर्वक डोळे झाक करीत आहेत. 


या प्रभागाच्या नगरसेवकाच्या शब्दाला पालिकेतील कर्मचारी किंवा पदाधिकारी, सत्ताधारी हे किंमत देत नसल्यानेच मराठा गल्लीतील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. त्याच बरोबर गटारीवर कोणत्याच प्रकारे जंतूनाशकाची फवारणी केली जात नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. म्हणून मराठा गल्लीतील नागरीकांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो तात्काळ पालिकेने सोडवावा अन्यथा शुक्रवार दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी  मराठा गल्ली येथून पालिकेवर बोंब ठोको मोर्चा काढण्यात येणार आहे. 

यामध्ये पालिकेच्या सर्वच नगरसेवकांच्या आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या नावाने बोंब मारुन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, तरी आपण याची दखल घेवून तात्काळ मराठा गल्लीतील रस्ता तयार करण्याची मागणी केली होती.
                                   
या निवेदनावर शिवशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज धिरुसिंह हजारे, पदाधिकारी  निखील येडगे, उपाध्यक्ष श्रीकांत सावंत, उपाध्यक्ष संतोष मुळे, कोषाध्यक्ष सहदेव जगताप, सचिव आकाश काळे, सहसचिव  युवराज जगताप,  सुधिर हजारे,  कुरुक्षेत्र किल्लेदार,  तानाजी सावंत, पांडुरंग गायकवाड,  सुहास येडगे,  तानाजी जाधव, शिवाजी सुरवसे आदीच्या सह्या आहेत.

 
Top