नंदगाव ,दि .३०
तुळजापुर तालुक्यात मागील दोन- तीन दिवसापासुन चालु असलेल्या सततच्या पावसामुळे नंदगाव गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या शिलंवती तलाव शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरीसह नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे.
मंगळवारी नंदगावचे सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील ,सागर चोगुले ,मंगेश कलशेट्टी ,कल्याण कुंभार ,इरण्णा वाले ,अप्पु करंडे, रहिम शेख यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले.