काटी ,दि .३०
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पिंपळा (बु) ते तामलवाडी रस्त्याला मंजुरी असताना प्रत्यक्ष कामाला मुहुर्त मिळालेला नाही. या मार्गावर प्रवाशांचे हाल कायम आहेत. याबाबत निवेदने देऊनही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही. गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली, तरीही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तुुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी तामलवाडी येथे महात्मा गांधी जयंतीदिनी 2 ऑक्टोंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यावर उपोषणाची वेळ आल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बुद्रुक) ते तामलवाडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतन मंजूर झालेले आहे. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यामुळे शेतकरी, शाळकरी मुले तसेच गरोदर महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे शिवाजी सावंत यांनी 7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यांसह खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती यांना निवेदन देऊन पिंपळा (बु.) ते तामलवाडी रस्त्याअभावी होणारे ग्रामस्थांचे हाल निदर्शनास आणून दिले आहेत. मात्र दखल घेतली जात नसल्यामुळे महात्मा गांधी जयंतीदिनी 2 ऑक्टोंबर रोजी तामलवाडी येथे शिवाजी सावंत यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.
पिंपळा ते तामलवाडी या 38 लाख 32 हजार 112 रुपये रस्त्याच्या कामाला उद्या 1ऑक्टोबर रोजी प्रत्येक्ष कामास सुरुवात करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून उद्या पासून कामाला सुरुवात होईल.
अभियंता काळे
जिल्हा परिषद, उस्मानाबाद
कामास सुरुवात झाल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी होणारे नियोजित आमरण उपोषण मागे घेणार
सामाजिक कार्यकर्ते
शिवाजी सावंत , तामलवाडी