कळंब , दि .१४: 

 येथील गांधीनगरमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आणि ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्माच्या प्रसार - प्रचारासाठी व्यतीत केले असे अजीवन बौद्ध उपासक, बौद्धाचार्य, श्रामणेर शिवाजीराव बाबुराव क्षीरसागर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने सोलापूर येथे  निधन झाले आहे. 


          
एक आदर्श बौद्ध उपासक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती होती. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य जिल्हाभर रुजवण्यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. धम्म परिषदा, धम्म शिबिरे यामधून बौद्ध धम्म प्रसार करण्यासाठी ते सतत कार्यरत होते. त्यांनी बौद्धाचार्य म्हणून जवळपास पाच हजार विवाह पार पाडले आहेत. 
          
क्षीरसागर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर  मंगळवार, दि. १४ सप्टेंबर  रोजी दुपारी एक वाजता कळंब येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात  आले.
 
Top