तुळजापूर, दि ६ : डॉ.सतीश महामुनी
तुळजापूर खुर्द येथील तुळजाई नागरी पतसंस्थेला अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनामा पुणे यांच्या वतीने प्रतिष्ठेचा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजनाद्वारे प्रगती केल्याबद्दल बँको ब्लू रिबन पुरस्कार कर्नाटक मधली खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
कर्नाटक येथील मैसूर येथे झालेल्या बँकॉक सहकार परिषद 2021 मध्ये हा पुरस्कार चार सप्टेंबर रोजी निपाणी चे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे . याप्रसंगी जेलसी नामा पुणे प्रमुख अशोक नाईक व अविज पब्लिकेशन संपादक अविनाश शित्रे यांची उपस्थिती होती .हा पुरस्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पंडित जगदाळे , संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र देशमाने, संचालक आमिर भाई शेख, महेश साबळे, प्रमोद क्षीरसागर यांनी स्वीकारला.
हा पुरस्कार मिळाल्याने तुळजाई नागरी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तुळजाई नागरी पतसंस्थेच्या कारभारामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा सभासदांना उपलब्ध करून देणे याद्वारे खातेदारांना आरटीजीएस, एनईएफटी सेवा एसएमएस सेवा एटीएम सेवा लॉकर सेवा नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिली. कोरोना मध्ये संस्थेने उस्मानाबाद येथे झालेल्या टेस्टिंग प्रयोगशाळेसाठी ५१ हजार रुपये देणगी दिली, सातत्याने समाजकार्य आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये पतसंस्थेने समाजाला मदत केली आहे या काळात सातशे कुटुंबांना साहित्याचे किट , हँड वॉश, फेस मास्क, डेटॉल साबण,यांचे वितरण केले.
याशिवाय संस्था सभासदांना होतकरू मुलींना शिलाई मशीन वाटप करणे, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी संस्थेकडून कुटुंब मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन करून घेते त्यांना संस्थेकडून कन्यादान योजनेमधून १ लाख रुपये अर्थसहाय्य करते, एक रुपया मध्ये बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, सर्व सभासदांचा एक लाख रुपये किमतीचा अपघाती विमा दिला जातो अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी संस्थेने कायमस्वरूपी ठेवलेली आहे.
१५ जून १९९७ रोजी केवळ २५ हजार रुपये भाग भांडवलावर सुरू करण्यात आली, आज मितीस संस्थेकडे १०५ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे २२ कोटी रुपयांच्या ठेवी बँकेकडे जमा आहेत, १६ कोटी रुपये कर्ज वितरण केलेले आहे, यामध्ये ९८ टक्के कर्ज वसुली असून कोरोना आपत्कालीन परिस्थिती मुळे केवळ २ टक्के थकबाकी आहे . मागील २५ वर्षापासून संस्थेने पारदर्शक कारभार करून अत्याधुनिक यंत्रसामग्री उपयोगात आणून संस्थेच्या सभासदांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
यापूर्वी संस्थेला राज्यातील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबई यांच्याकडून ५ वर्ष दिपस्तंभ पुरस्कार, सहकार सुगंध व सहकार भारती यांच्या वतीने प्रतिबिंब पुरस्कार सलग ३ वेळेस प्राप्त झाला आहे .
यावर्षी बँको पतसंस्था ब्लू रिबन हा उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजनाद्वारे संस्थेची प्रगती करण्याच्या कारणाने पुरस्कार देण्यात आला आहे या यशाबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे