चिवरी , दि . ०६
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामपंचायतच्या वतीने २६३ ग्रामस्थांना सोमवारी दि.६ रोजी कोव्हीशिल्डचे डोस देण्यांत आले.१८ व ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
यासाठी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांची सोय व्हावी या साठी गावातच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य सेवक निखिल डांगे, डॉ.मल्लया स्वामी, आरोग्य सेविका गवळी, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार,उषाबाई नगदे, लक्ष्मी मेंढापुरे, आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने, राजश्री कांबळे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, संगणक चालक शंकर झिंगरे, तानाजी जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.