नळदुर्ग , दि .०६
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक होवुन विविध विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण होते.यावेळी कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरातुन ज्या औषध, गोळ्याचा तुटवडा आहे .ते औषध खरेदी करण्यासाठी रूग्ण कल्याण समिती मधुन खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली. रुग्ण कल्याण समितीचे बजेट वाढविण्यासाठी ठराव घेण्यात आला, इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली .
कोरोनाची परस्थिती असताना बैठकीला पंचायत समितीचे बी.डी.ओ.बी.ओ.सीडी.पी ओ.यांचे प्रतिनिधी सतत गैरहजर असल्याने संबंधितांना नोटीस देऊन विचारणा करण्यात यावी असे रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष यांनी सुचना केल्या.
यावेळी डॉ राहुल जानराव, डॉ आनंद काटकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य अजय बागडे, प्ररब़ोद कांबळे, आरोग्य साहाय्य मधुकर जाधव, तानाजी सांळुके, औषध अधिकारी गणेश बडुरे पद्माकर कुलकर्णी, विलास जाधव, मनिषा सरवदे, सुनिता करदुरे, सुनिता गजले उपस्थित होते.