नळदुर्ग , दि .२४

तुळजापूर फाटा गोलाई - ते-बसस्थानक पर्यंत स्ट्रीट लाईट व हाईमास्ट  लँंपची कामे येत्या सात दिवसात सुरु करावे या विषयीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तूळजापुर-नळदुर्ग-अक्कलकोट महामार्ग सोलापुर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे, 


निवेदनात पुढे म्हटले आहे की, मनसेच्या वतीने अनेक महिन्यापासुन सदर विषयासाठी पाठपुरावा करीत आहोत,गोलाई-ते-बसस्थानक पर्यंत  स्ट्रीट लाइट व हाईमास्ट लैंपची गरज किती आहे. हे आपणास आम्ही वेळोवेळी निदर्शानास आणून दिले आहे.सायंकाळच्या वेळेस वाहन धारकाना समोरील वाहनांच्या लाइट मुळे नियंत्रण राहत नाही,महामार्गावरआंधार पसरतो,रस्ता मोठा झाल्या कारणाने वाहनांच्या रांगाच्या रांगा असतात,यापूर्वी वाहन चालकात संभ्रम निर्माण झाल्यामुळे अपघात झाले आहेत, याठिकानी स्ट्रीट लाइट व हाईमास्टचे काम लवकर न झाल्यास,व त्यामुळे काही अपघात घडल्यास जबाबदार कोन?टीम लीडर यांच्याकडून वरिष्ठाशी चर्चा करून या महिन्यातील १० तारखेपर्यत ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासित केले होते,त्यानंतर १५ दिवस उलटून गेले आहेत,या कामासाठी नगरपालिका देखभालीची हमीपत्र दिले आहे,मग अड़चण कोठे आहे,का,निवेदनाची भाषा समजत नाही? आपल्या विभागाच्या संबधिताकडून आम्हाला आश्वासित केलेली वेळ निघुन गेली आहे,आमच्या शहरातील महामार्गावर कोणतीही घटना घडू नये, अपघात घडू नयेत यासाठी आम्ही वेगवेगळे विषय मांडून नागरिकांना सोईचे होईल यासाठी प्रयत्न करीत आहोत. 


गेल्या दीड महिन्यापासुन सदर विषयासंदर्भात टोलवा-टोलवीची उत्तरे येत आहेत,म्हणून  याप्रकरणी  तात्काळ लक्ष घालून येत्या सात दिवसात गोलाई-ते-बसस्थानक पर्यंत स्ट्रीट लाइट व हायमास्टचे काम सुरु करावे,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाइलने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा निवेदनाद्वारे  महाराष्ट्र नवनिर्माण सेना,नळदुर्ग शहराच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला आहे.
 
Top