अणदूर  दि.२३

 अणदूर ता. तुळजापूर  व परिसरातील गावातील नागरिक टोल नाका व्यवस्थापनाला टोलमधून सुट मिळण्यासाठी वाहनमालक कागदपत्रे घेवून निवेदन द्यायला गेले असता टोल नाका प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने जमाव व अधिका-यामध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याने टोल नाक्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


 फुलवाडी (ता.तुळजापूर) येथील टोल नाक्याच्या दहा किलोमीटर परिघातील वाहनधारकांना नियमानुसार सुट असताना त्यांच्याकडून सक्तीने टोल वसुली गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे.ती थांबवावी यासाठी अणदूर, फुलवाडी, धनगरवाडी,खुदावाडी, सराटी, शिरगापूर, उमरगा(चि.), केरुर, येथील वाहनमालकांनी या आगोदर जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक,महामार्ग प्राधिकरण यांना टोलमधून सुट मिळावी म्हणून निवेदन दिले होते. 

त्याअनुषंगाने कांही लोकप्रतिनिधी व वाहनमालक गुरुवारी (ता.२३) वाहने घेऊन कागदपत्रे  देण्यासाठी टोल नाक्यावर गेले होते .दरम्यान नाका व्यवस्थापन व गेलेल्या प्रतिनिधिंशी चर्चा सुरु असताना टोल कर्मचा-यानी उद्धट भाषा वापरुन शिविगाळ करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावेळी किरकोळ धक्काबुक्की झाली आहे. यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.या अगोदरही बरेच दिवस या टोलनाक्यावर स्थानिक वाहन धारक यांच्या बरोबर नाका व्यवस्थापनाचे वाद झाले आहेत ,हा प्रश्न वेळीच सोडवणे गरजेचे झाले असून प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास जवळपास आठ गावातील नागरिक तिव्र आंदोलनाच्या पावित्र्यात  असल्याचे बोलले जात आहे..
 
Top