तुळजापूर दि . ५ :


तुळजापूर तालुक्यातील आरळी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा शनिवार दि ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली .

सरपंच सौ पल्लवी सतिश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक बी. बी .कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली .


या ग्रामसभेत  महादेव देवबा गायकवाड यांची आरळी खुर्द गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर पाणीपुरवठा समिती, दक्षता समिती, ग्रामसुरक्षा समिती अशा समित्या स्थापन करण्यात आल्या, म ग्रा रो ह योजना कृती आराखडा व जलजीवन मिशन यावर या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.


कोरोना नियम अटी शर्तीचे पालन करीत ही ग्रामसभा खेळीमेळीचा वातावरण पार पडली शेवटी उपस्थितीतांचे ग्रामसेवक बी बी कुंभार यांनी आभार मानले.
 
Top