तुळजापूर दि .५ : राजगुरू साखरे

 शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करणारा,  शेतकऱ्याच्या लाडक्या सर्जा-राजाचा सण अर्थात " बैल पोळा " हा सण अवघ्या  काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. 



बाजारात शेतकरी बांधव पोळा सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग करत असल्याचे दिसत आहे. पोळा सणाच्या अनुषंगाने   झुल,बांशिग, वेसन, घुंगरू,तोडे, दोरखंड, चंगाळी, घाटी, मोहरकी , शिंगाचे रंग, फुगे आदी विविध सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण थोडे फार चांगले असल्याने शेतातील पिकेही बहरल्याचे दिसत आहेत . सलग दोन वर्षापासून बैल पोळा सणावर कोरोनाचे सावट उभे ठाकले आहे. तरीही बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या हौस पुरी करण्याकरिता थोडीही काटकसर करत नसल्याचे दिसत आहे. 


एकंदरीत दरवर्षीच्या तुलनेत बैलाच्या साजाच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र लाडक्या सर्जा-राजाच्या तुलनेत ही वाढ जास्त वाटत नसल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
 
Top