नळदुर्ग , दि .५ :
राष्ट्रीय महामार्ग क्र . 652 नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा करून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार कर्मचारी शेतकऱ्यांना नाहाकच त्रास देत आसुन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे आवमान होत असुन त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदार तांदळे यांना निवेदन देवुन मागणी केल्याची माहिती सरदारसिंग ठाकुर यानी दिली.
निवेदनावर सरदारसिंह ठाकुर , दिलीप जोशी , दिलिप पाटिल , संतोष फडताळे , व्यंकट पाटिल, महादेव बिराजदार, तोलु पटेल, प्रताप ठाकुर योगेश सुरवसे आदीसह अन्य शेतक-याच्या सह्या आहेत.