काटी , दि .५: उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी, अपसिंगा, कात्री, कामठा येथील वारकरी साहित्य परिषद, उस्मानाबाद अंतर्गत काटी येथील  समर्थ महिला भजनी मंडळ, अपसिंगा येथील सावता माळी महिला भजनी मंडळ, गजानन महिला भजनी मंडळ, कात्री येथील जय हनुमान महिला भजनी मंडळ, कामठा येथील माऊली महिला भजनी मंडळाच्या वतीने महिला भजनी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा हभप सौ. सुनिता महादेव आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली व  तालुकाध्यक्षा सौ. वसुधा विलास कुलकर्णी, तालुका उपाध्यक्षा सौ.अनिता शिवाजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी कलावंत व कीर्तनकारांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महिना पाच हजार मानधन त्वरित देण्याची मागणी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.



महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, उस्मानाबाद अंतर्गत 
काटी येथील समर्थ महिला भजनी मंडळ, अपसिंगा येथील सावता माळी व गजानन महिला भजनी मंडळ, कात्री येथील जय हनुमान महिला भजनी मंडळ व कामठा येथील माऊली महिला भजनी मंडळ या शाखेंच्या वतीने कलावंत व कीर्तनकारांना महिना पाच हजार मानधन त्वरित मिळावे या मागणीसाठी शुक्रवार  दि.(3) रोजी महिला भजनी मंडळातील वारकरी, पदाधिकारी व सर्व कलावंतांच्या उपस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भजन, कीर्तन व प्रवचन इत्यादींंच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम बंद पडल्यामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने कोरोना काळात या वारकरी कलावंताना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, या मागणीसाठी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


या निवेदनावर वारकरी संप्रदायाच्या जिल्हाध्यक्षा हभप सौ. संगिताताई आडसुळ, तालुका अध्यक्षा सौ. वसुधा कुलकर्णी, तालुका उपाध्यक्षा सौ. अनिता राऊत, सौ.आर्या अतुल सराफ
आदींच्या सहीने हे निवेदन देण्यात आले आहे.
 
Top