तुळजापूर दि. ५  
 
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी केलेल्या थँक्स टीचर शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्याचे आवाहान करण्यात आले होते.त्यास प्रतिसाद देत जि.प. प्रा.शा.केमवाडी ता.तुळजापूर येथील शिक्षकांनी कोवीड पार्श्वभूमीवर सरल प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांकडून शिक्षकाविषयी आपल्या भावना व्यक्त करणा-या भाषणांचे व्हीडीओ , निबंध, काव्यलेखन,वाचनाचे  आदि उपक्रम घेण्यात आले. 

यामध्ये ओंकार माळी, अभिषेक माळी, धनश्री नकाते, हर्षदा हेगडे, सुमैय्या मुजावर , मुस्कान शेख, ऋतुजा पाटील, सोनाली पाटील, समर्थ नकाते.आदि विद्यार्थ्यांनी भाग घेतला.  ' थँक्स अ टीचर 2021' हा हॅश टॅग लावून हे उपक्रम शाळेच्या फेसबुक पेज, शाळा व्यवस्थापन समितीच्या , शाळा शिक्षकवृंद , आणि वर्गाच्या हॉटसप शैक्षणिक ग्रूपसह अन्य सोशल मिडियावर प्रसारित करून https://scertmaha.ac.in/thankateacher/register.aspx या प्रणालीवर स्पर्धेसाठी नोंदवण्यात आली. 

          
तंत्रस्नेही तथा साहित्यीक कवी असलेले शिक्षक बापू काळे यांनी मुलांना तांत्रिक सहाय्य केले. तर उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी  अर्जुन जाधव , केंद्र प्रमुख संजय सोलनकर   सरपंच राजेंद्र डोलारे,उपसरपंच गौरीशंकर नकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदासह पालकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top