काटी ,दि . २१ : 

काटी ता . तुळजापूर  येथील  राष्ट्रवादी काँग्रेसचे  सक्रिय कार्यकर्ते जुबेर हारुणमियॉं शेख   यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी  निवड करण्यात आली  आहे. 


 राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खाँन पठाण यांच्या हस्ते व अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण, प्रदेश सचिव इलियास पिरजादे, तुळजापूर, तुळजापूर तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, वाजीद पठाण आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील  राष्ट्रवादी काँग्रेसचे  सक्रिय कार्यकर्ते जुबेर हारुणमियॉं शेख   यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी  निवड केली आहे. 



राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खाँन पठाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करावा असे सुचित करून पुढील कार्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.
            
 
Top