जळकोट, दि.१८ , मेघराज किलजे
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांची कळंबच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल चव्हाण यांचे सर्वञ आभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका,ब्लाॅक ,बुथ कमिटीचे कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी निरीक्षकाच्या नेमणुका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत .
यामध्ये उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांची कळंबच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.