इटकळ , दि.१८ :

इटकळ ता. तुळजापूर येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन  दि.१८ रोजी करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  सौ.अस्मिता कांबळे,बांधकाम सभापती दत्ता देवकर,तुळजापूरचे पंचायत सभापती सौ.रेणुका इंगवले,उपसभापती दत्ता शिंदे ,दिपक  आलुरे ,वसंतराव वडगावे,अरविंद पाटील उपस्थितीत उपस्थितीत होते.


आमदार निधीतून हनुमान मंदिरासमोर सभामंडप व  विविध विकास कामे यामधून गावामध्ये सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायती मार्फत प्रलंबित विकास कामाच्या  आराखड्यांच मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना करण्यात आली. यामध्ये गावातील गटारी भुयारी मार्गाने करणे,दलित वस्तीमध्ये सभामंडप,वर्गासमोर सभामंडप,बैद्ध स्मशानभूमी ,जि.प.वर्ग खोल्या व शैच्छालय बांधणे, ग्रामपंचायत , व तलाठी कार्यालयात बांधणे या मागणी करण्यात आली. 

यावेळी सरपंच  सौ. राजश्री बागडे,पिटू मुळे, फिरोज मुजावर,श्रीकृष्ण मुळे ,राहुल बागडे ,सायबा क्षीरसागर ,नजिर मुजावर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक माशाळे,तलाठी सौ मुळे यांच्यासह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

 
Top