तुळजापूर, दि .२१: एस.के.गायकवाड
महाराष्ट्र राज्य ग्रासेवक संघटना तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत माहिती असी की, महाराष्ट्र राज्य ग्रासेवक संघटना तालुका शाखा लोहाराच्या वतीने लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या बदलीसंदर्भात पुकारलेल्या असहकार आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता ग्रामसेवक संघटना तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने तुळजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष देवानंद रेड्डी, उपाध्यक्ष गोपाळ करदोरे,सचिव संजय घोगरे,,कोषाध्यक्ष महेश मोकाशे,महिला उपाध्यक्ष्या स्वाती खोपडे, ग्रामसेवक एस.बी.मार्तंडे, आर.एम.शिरगीरे, पी.पी.कुंभार,एस.के.कुंभार,पी.एम.शिंदे,एस.बी.घोडके, एस.सी.माशाळे,एन.आर.सुर्यवंशी, बी.व्ही देवकते,व्ही.एस.लाटे,एन.आर कांबळे, आदीसह ग्रासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.