अणदूर , दि .२१ :
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे तेरणा सुपर स्पेशालिटी हाँस्पिटल नेरुळ नवी मुंबई व आरोग्य विभाग जिल्हा परीषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने माजी जि. प. अध्यक्ष शिवदास कांबळे यांच्या मातोश्री कै. पद्माबाई कांबळे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार दि. 21 सप्टेंबर रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये विविध आजाराच्या 766 रुग्णावर निदान करून उपचार करण्यात आले,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अशोक चिंचोले तर प्रमुख पाहुणे म्हणुन तेरणा ट्रस्टचे प्रथ्वीसिंह पाटील,सभापती रेणुका इंगोले,सरपंच रामचंद्र आलुरे , महादेवप्पा आलुरे,डॉ अजित नळे हे होते . या शिबिराचा लाभ परिसरातील गरीब, गरजू,रुग्णांनी घेतला ,सध्या अणदूर परिसरात विविध साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे, त्यामुळे सामान्य,जनता त्रस्त झाली आहे, महागड्या आरोग्य सेवेमुळे सामान्य माणूस, त्रासून गेला असून अशातच या सर्वरोग, मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास वाड्या, वस्ती, तांडे, गाव यातील रुग्णांनी उत्सर्फुत प्रतिसाद दिला . तपासणी नंतर आवश्यक ती औषधे, मोफत देण्यात आली,
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रेरणेने तेरणा ट्रस्ट, तेरणा जनसेवा केंद धाराशिव, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई व आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिर घेण्यात आले असून त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णावर निदान केले .60 रुग्णाना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन लिंबाजी सुरवसे यांनी तर आभार माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी मानले .सदरील शिबीर उदघाटन वेळेस महादेवप्पा आलूरे, सिद्धाराम कोरे, अरविंद पाटील, शिला गायकवाड, खोबरे गुरुजी, नाना गुरुजी, बबन कंदले, अरविंद आलूरे, आदी मान्यवर उपस्थित होते.