जळकोट,दि.१२

तुळजापूर  तालुक्यातील लोहगाव व परिसरात मागील आठवाड्यात झालेल्या जोरदार पावसाने 
   खंडाळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने तुडूंब भरला असून सांडव्यातून पाणी पहात आहे.



त्यामुळे परिसरातील  शेतकरीसह नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे .रविवार(दि.१२) रोजी परिसरातीर  शेतकर्यांच्या वतीने प्रकल्पाचे जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.जलपूजन ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांच्या व उपस्थीतीत शेतकर्यांच्या  हस्ते  करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते  महेबूब शेख, शेतकरी नागनाथ फडताळे,हरि राठोड,मल्हारी कोकरे,मारूती बनसोडे,सुर्यकांत फडताळे,मधुकर चव्हाण,महादेव कोकरे,खंडू टकले यांच्यासह आदि शेतकरी, नागरीक उपस्थीत होते.
 
Top