काटी ,दि .१२
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार, शनिवार व दि. 12 सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत डेंगूसदृश्य आजाराबाबत, टायफाईड, चिकनगुनिया रोगांपासून दक्षता घेण्यासाठी संपूर्ण गावामध्ये फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.
डेंगूसदृश्य आजाराबाबत दक्षता घेण्यासाठी तामलवाडी ग्रामपंचायत सतर्क झाली आहे. फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यात आल्याची माहिती सरपंच सौ.मंगल बंडु गवळी, उपसरपंच हमीद पठाण, व ग्रामसेवक दयानंद रेड्डी, हणमंत गवळी यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली प्राथमिक जबाबदारी असून तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात घरांच्या आजुबाजुला, गटारीवर मशीनद्वारे फवारणी करुन डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत असल्याचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.