नळदुर्ग ,दि .१५ : सुहास येडगे

 शहरातील विकास कामाकरीता नगपालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या प्राप्त ई निवीदा मंजूरीसाठी  सभागृहामध्ये सर्व नगरसेवकांच्या समोर उघडण्यात यावेत, यासाठी विेशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी नगरपालिकेच्या  १२ नगरसेवकांनी नगराध्यक्षा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे, याप्रकरणी   नगराध्यक्षा याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे.


शहरात विकास कामा करीता नगपालिकेकडून विविध विकास कामाच्या दि. ३१ ऑगस्ट  २०२१, दि. २ सप्टेंबर २०२१, दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी ई निवीदा काढण्यात आल्या आहेत, त्यानुसार सदरच्या निवीदा प्रक्रीयेत पारदर्शकता यावी, यासाठी नगरपालिकेच्या एकूण १२ नगरसेवकांनी लेखी निवेदन देवून नगराध्यक्षाकंडे सर्व साधारण सभागृहासमोर प्राप्त झालेल्या ई निवीदा उघडण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान या निवेदनात या नगरसेवकांनी म्हटले आहे की, दि. ६ /९/ २०२१ रोजी १२ नगरसेवकांच्या पत्राचे आवलोकन व्हावे, त्याचबरोबर यापूर्वीचे स्थायी समीती सदस्य यांचे दि. ९/९/२०२१ चे आवलोकन व्हावे आणि प्राप्त झालेल्या ई निवीदा प्रक्रीयेत पारदर्शकता येण्यासाठी आणि मंजूरीसाठी प्राप्त झालेल्या ई निवीदा सभागृहासमोर उघडण्यात याव्यात, त्यामुळे यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी  अशी मागणी नगपालिकेचे विरोधी पक्षाचे गटनेते नगरसेवक नय्यरपाशा जहागिरदार, उदय जगदाळे, शहबाज काझी, निरंजन राठोड, सौ. भारती बनसोडे, श्रीमती सुफीया कुरेशी, श्रीमती शाहेनबी मासुलदार, दयानंद बनसोडे, मन्नाबी गफार कुरेशी, श्रीमती असीफा बेगम काझी, बसवराज धरणे, सौ. छमाबाई राठोड आदीनी लेखी निवेदनाद्वारे  नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
 
Top