जळकोट,दि.२४ : मेघराज किलजे
महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून , जिल्हाध्यक्षपदी व्ही. एम.भुतेकर यांची तर राज्य प्रतिनिधीपदी नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये उस्मानाबाद जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस संघटनेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली ती अशी - सचिव- नितीन पाटील, कार्याध्यक्ष-एम.ए. पाटील, उपाध्यक्ष- धन्यकुमार बिराजदार, संभाजी जाधव, सहसचिव- बाळासाहेब अरनाळे, प्रवीण पाटील, कोषाध्यक्ष- भुजंग लोकरे, सहकोषाध्यक्ष- सुनील घोगरे, प्रसिद्धीप्रमुख- नानासाहेब साखरे, महिला प्रतिनिधी-सौ.ए. एल. सांगळे,व्ही. एस. देशमुख, सल्लागार, मार्गदर्शक- राजा प्रसाद सगर,डी. पी. बनसोडे,एस.एन. सूर्यवंशी, सोमनाथ गायकवाड, जयराज गोले,आर.एस. ढवळशंख, प्रवीण व्ही. पाटील यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.