नळदुर्ग , दि .२८

शासकीय जागेवरील निवासी तसेच वाणिज्य प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकुल करण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय  आजच्याच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर १९९९ ला युती सरकारच्या काळात झाला. माञ या शासन निर्णयाची २३ वर्षात अंमलबजावणी न झाल्याने या
शासन निर्णयाचे मनसेच्या वतीने उपहासात्मक  वर्धापन दिन साजरा करुन  निषेध केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी व या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली   नळदुर्ग  येथिल लोकमंगल बँकेच्या जवळ मंगळवार दि. २८ सप्टेंबर रोजी  शासन निर्णयाच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन २३ वा वर्धापनदिन साजराकेला.

१९९९ साली युती सरकारच्या या शासन  निर्णयानंतर अवघ्या एक महिन्यात विधानसभा भंग होऊन मुदतपूर्व निवडणूक झाली. यात युती सरकारचा पराभव होऊन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अस्तिवात आले त्यानंतर ही  या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने हा शासन निर्णय अडगळीत पडला . ४ एप्रिल २००२ रोजी तत्कालीन  मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांनी या शासन निर्णयाचे पुनर्जीवन केले.  एक जानेवारी १९८५  ऐवजी  १ जानेवारी १९९५ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला. पण हाही शासन निर्णय अडगळीत पडला . या निर्णयाच्या अंमलबजावणी साठी  दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने २३ जून २०१५  रोजी  या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही . 


१ जानेवारी १९९५ पूर्वीची सरकारी जागेवरील अतिक्रमने नियमित करण्याची तरतूद या शासन निर्णयात आहे .  झोपडपट्टी धारकांना अतिक्रमण झालेल्या दिवशीच्या बाजार भावा एवढी , झोपडपट्टी व्यतिरिक्त अतिक्रमण धारकांना अडीचपट , अतिक्रमण वाणिज्य प्रयोजनासाठी असलेल्या अतिक्रमित धारकांकडून पाचपट रक्कम आकारून  अशीअतिक्रमणे नियमित करण्याची तरतूद आहे. या जागांचे ले- आऊट करण्यासाठी ग्रामीण भागात तहसीलदार तर शहरी भागात महापालिका आयुक्त,मुख्याधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन  करण्याचे आदेश या निर्णयात आहेत. 

या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास झोपडपट्टी धारक जागेचा खऱ्या अर्थाने  मालक होईल.व नळदुर्ग शहरातील जवळपास ७००-८००गोर-गरीबाना हक्काचे घर व न्याय  मिळेल म्हणून  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाचे लक्ष्य वेधन्यासाठी व या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँकच्या जवळ  सकाळी -१० वाजता, सदर निर्णयाच्या पत्रकास (जी.आर.)हार घालत २३ वा वर्धापन दिन साजरा करून शासनाचा निषेध केला,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार, दिलीप राठोड,संदीप वैद्य, अहमद तांबोळी , रोहित नागरसे अदिसह नागरिक उपस्थित होते.
 
Top