वागदरी , दि . १५

बोरगाव (तुपाचे) ता.तुळजापूर येथील फुले- शाहू -आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आरविंद डोंगरीबा गायकवाड यांचा रिपाइं (आठवले) सह विविध पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.


  
आरविंद गायकवाड यांची निती आयोग प्रमाणित भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या सक्रिय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या   निवडीबद्दल नळदुर्ग येथे रिपाइंसह विविध पक्ष व संघटनेच्या मित्रपरिवारांच्या वतीने शाल,  फेटा, पुष्पहार,पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष आरूण लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशिक्षक आर.एस.गायकवाड, माजी सैनिक मधुकर लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रतिपाल सदाफुले, लक्ष्मण लोखंडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top