नळदुर्ग , दि . ३१
लोहगाव ता. तुळजापूर येथे ग्रामस्था च्यावतीने आयोजित जनशुभदा फाउंडेशन चषक 2021 चे रविवार रोजी उदघाटन जनशुभदा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गुडडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित लोहगावचे सरपंच पती रविंद्र दबडे, धनगर समाज महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे , उपसरपंच प्रशांत देशमुख,अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान, नागनाथ पाटील ,शिवसेनेचे सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते रवी शिंगाडे , फयाज सावकार, प्रवीण पाटील ग्रा. प . सदस्य निजाम शेख, पोलिस पाटील शिवानंद पाटील,मानेवाडीचे शहाजी हाक्के यासह अनेक पदाधिकारी व लोहगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सोमनाथ गुडडे यांनी बोलताना हे चषक युवकाना सोबत घेऊन प्रत्येक वर्षी ठेवणार असुन ग्रामीण भागातील युवक क्रिडा क्षेञात नावलौकिक मिळवुन यशस्वी व प्ररेणादायी कार्य करावे अशी आपेक्षा व्यक्त केली.