वागदरी , दि .३० एस.के.गायकवाड
माजी मंत्री , काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या पत्नी शालिनीताई मधुकरराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या घरी अणदूर ता.तुळजापूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सात्वन केले.
कै.शालिनीताई मधुकरराव चव्हाण वय वर्ष 82 वर्ष यांचा नुकतेच पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
निधनाची बातमी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कळताच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे चव्हाण कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य बाबुराव मधुकरराव चव्हाण यांची भेट घेऊन सांत्वन केले . यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील, प्रकाश चव्हाण, नगरसेवक शहबाज काझीसह जिल्ह्यातील नातेवाईक , हितचिंतक उपस्थित होते.