काटी , दि .३०
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 30 रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना महामारी व अतिवृष्टीने मोठे संकट उभे केले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून अनेकांचे व्यवसाय बुडाले अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा न करता विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून राणाजगजितसिंह पाटील मित्र मंडळ व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येथील ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर, साडी चोळीचे वाटप व लसीकरण मोहिमचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा ॲड. क्रांती थिटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराच्या विधायक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.कोरोना संकटाच्या काळात अनेक रक्तपेढ्यातील रक्ताचा साठा कमी झाला आहे. रक्ताची टंचाई दुर व्हावी व गरजूं रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने बार्शी येथील श्री भगवंत ब्लड सेंटर बॅंकेच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिराला तरुण वर्गासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महा रक्तदान शिबिरात सौ.उज्वला प्रकाश हंगरकर या महिलेनेही रक्तदान करुन आपला सहभाग नोंदविला. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून नागरिकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 50 जणांनी रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यकक्षा ॲड. क्रांती थिटे यांच्या वतीने 25 महिलांना साडी,चोळीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच कोविशिल्ड पहिला व दुसरा डोस लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यामध्ये पहिला डोस 95 तर दुसऱ्या डोस साठी 5 जणांनी लसीकरण करून घेतले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सर्व रोग निदान शिबिर भरविण्यात येत असून दुर्धर आजारावर तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार आहे. या शिबिरात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांनी केले असून रक्तदान शिबीरात संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली राष्ट्रीय जबाबदारी असून आपले रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतो. ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजे असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,ॲड.क्रांती थिटे, भागवत गुंड,बाळासाहेब भाले, माजी सैनिक श्रीकांत गाटे,माजी सैनिक संतोष थिटे, मकरंद देशमुख, अनिल बनसोडे, संजय महापुरे,अतुल सराफ, अविनाश वाडकर, अविनाश देशमुख, रणजीत देशमुख, नंदु बनसोडे, श्रावण वाघमारे आदीसह ग्रामस्थ भाजप कार्यकर्त्ये उपस्थित होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अरळी (बु.) येथे शालेय साहित्याचे वाटप
तुळजापूर तालुक्यातील अरळी (बु.) येथे शनिवार दि. 30 रोजी येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेत सकाळी 10:30 वाजता सरपंच गोविंद रंगनाथ पारवे यांच्या वतीने पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच गोविंद पारवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव जाधव, उपाध्यक्ष विलास उकरंडे, सोसायटीचे चेअरमन अनिल जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गवळी, लक्ष्मण कचरे, कालिदास माने, नागनाथ बचाटे, संजय पारवे, धनाजी धोतरकर, उमेश पुरी, शाळेचे मुख्याध्यापक गौतम राठोड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.