नळदुर्ग , दि. २९ :
राज्यातील नगरपालिका निवडणुका होईपर्यंत नगर रचना विभागाने रचना साहय्यक व नगर रचनाकार यांच्या नगरपालिकेच्या बाहेर केलेल्या बदल्या रद्द करण्याची मागणी विधानपरिषद सदस्य आमदार सुरेश धस यानी राज्य निवडणुक आयुक्त मुबंई यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
संचालक नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग पुणे यांच्या दि. ३० आॕगस्ट २०२१ च्या आदेशान्वये रचना साहय्यक गट ब व साहय्यक नगर रचनाकार गट ब या संवर्गातील ९३ पैकी अंदाजे ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या न.प. च्या बाहेर (साईट पोस्टला) कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुदतपुर्वी नगरपालिकेतुन इतर ठिकाणी केल्या आहे.
तरी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता पालिकेतील भौगोलिक स्थिती , जणगणना नकाशा , विकास आराखडा नकाशा व प्रभाग रचना याचा आभ्यास झालेला आहे.तसेच निवडणुकीचे संदर्भातील गोपनिय व महत्त्वाचे कामकाज करण्यासाठी सदर कर्मचारी ,मुख्याधिकारी व नगरपालिका यांना आवश्यक आहे. तरी ऐन निवडणुकी च्यावेळी त्यांची नियुक्ती सदर नगरपालिके मध्ये असणे गरजेचे आहे.
या वरिल बाबीचा विचार करुन संबधित कर्मचाऱ्यांच्या संपुर्ण महाराष्ट्रात झालेल्या ९३ पैकी ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या नगरपालिके बाहेर झलेल्या बदल्या रद्द करुन त्याना मुळ नगरपालिके मध्ये नियुक्ती देण्यासाठी कर्मचा-याच्या बदल्या या निवडणुक होईपर्यंत रद्द करण्यात याव्यात व संबंधित नगरपालिकेत हजर होण्याचे आदेश तात्काळ आपल्या स्तरावरुन देण्यात यावेत असेही आमदार धस यानी पञात शेवटी म्हटले आहे. याची एक प्रत नगरविकास विभागाचे प्रधानसचिव , नगरप्रशासन विभागाचे आयुक्त तथा संचालाक याना पाठविले आहे.