जळकोट,दि.२९ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवाजी चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवे शाखा व्यवस्थापक म्हणून नामदेवराव पाटील हे रुजू झाले.
सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. अनिकेत यादव यांनी यापूर्वी शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. त्यांची सांगली जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी पाटील यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कॅशियर प्रवीण इंगवले, बँक अधिकारी सौरभ माळबोरगावकर, बँक अधिकारी रंजना समरित, बँक कर्मचारी अल्ताफ जमादार, बँक मित्र गणेश वागदरे, बाळू मारेकर, लक्ष्मण कदम, अंकुश भोसले, बँकेचे खातेदार आदीजण उपस्थित होते.