तुळजापूर दि २८ :
स्टेट बँक ऑफ इंडिया या शिखर बँकेच्या कारभारामध्ये अनेक वर्ष सेवा करण्याची संधी तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने आपण यशस्वीपणे पार पाडू शकलो असे निवृत्त एसबीआय मुंबई एच. आर. मॅनेजर रमेश खोपकर यांनी तुळजापुरात सांगितले .
स्टेट बँक ऑफ इंडिया गोरेगाव मुंबई येथील शाखेमध्ये एच आर मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळजापुरात समता नागरी पतसंस्था व संस्कार भारती तुळजापूर यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विनोद खपले, ज्येष्ठ उद्योजक किसनराव डोंगरे ,संस्कार भारतीचे प्रदेश लोककला प्रमुख डॉ. सतीश महामुनी, समता पतसंस्थेचे चेअरमन शांताराम पेदे, संस्थापक अध्यक्ष अविनाश धट, संस्कार भारती अध्यक्ष पद्माकर मोकाशे, माजी नगरसेवक चंद्रकांत लोंढे, उद्योजक कालिदास चिवचिवे, पुजारी श्याम शिरसागर, रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी कुंदन कोंडो, पुजारी विजय कदम, पुजारी किसनराव कदम, सेवानिवृत्त अधिकारी आनंद मोरडे, सुधीर महामुनी, सचिव कालिदास भोसले, आकाश धट, राहुल खोपकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशभरातील मोठी बँक असून मुंबई येथील शाखेमध्ये काम करण्याचा अनुभव अत्यंत समाधान कारक होता तत्पूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण सेवा केली असून प्रदीर्घ काळ बँक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण चांगले काम केले याचे समाधान असून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपण पूर्ण केल्याचे यावेळी सेवानिवृत्त शाखाधिकारी रमेश खोपकर यांनी आवर्जून सांगितले. शासन निर्देशाप्रमाणे आयुष्यातील सर्व सेवेमध्ये संबंधित घटकाला न्याय देण्यासाठी आपण पराकोटीचे प्रयत्न केले त्याचबरोबर गरजू व्यापारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विनोद खपले यांनी रमेश खोपकर यांचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांनी अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये रमेश खोपकर यांनी शिक्षण घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे व उत्तम समाजाची बँकेच्या माध्यमातून सेवा केली आहे ही सेवा तुळजापूरकर निश्चितपणे कायमस्वरूपी लक्षात ठेवतील त्यांची कार्यपद्धती आणि स्वभाव या गुणवैशिष्ट्यांमुळे ते सदैव प्रशासकीय कामात यशस्वी झाले अशा शब्दात यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने गौरव करण्यात आला.