काटी , दि. ३१  उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. (31) रोजी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयात तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात 550  रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. 



तर शनिवारी झालेल्या  याच ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात 50 जणांनी रक्तदान केले होते. डॉ.अजित निळे यांच्या नेतृत्वाखाली विविध आजारांचे जवळपास 12 तज्ञ डॉक्टरांनीं या शिबिरात सहभाग घेतला होता. 
        प्रारंभी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते 
 दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर शिबिरातील विविध आजारांचे तज्ञ डॉक्टरांचे व उपस्थित मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 शिबिरात नोंदणी विभाग, स्त्री रोग विभाग, हृदयरोग विभाग, नेत्र रोग विभाग तसेच औषध वितरण विभाग अशा प्रकारे विविध आजारांचे स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आल्याने रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती. या शिबिरात काटीसह परिसरातील 550 गरजू  रुग्णांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.  या तपासणी शिबिरास तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ.रेणुकाताई इंगोले यांनी भेट दिली.
        
 यावेळी सभापती रेणुका इंगोले, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, सरपंच आदेश कोळी, पं.स. सदस्य रामहरी थोरबोले, मोतीराम आगलावे, भागवत गुंड, माजी सैनिक श्रीकांत गाटे, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, संजय महापुरे, मकरंद देशमुख, सुहास साळुंके, अतुल सराफ, अविनाश वाडकर, सतीश देशमुख, पोलीस पाटील सुनंदा म्हेत्रे यांच्यासह डॉ. अजित निळे, डॉ. रोहित दामोदर, डॉ. निशांत शिंदे, डॉ. अक्षय बहिर, डॉ. विनोद ओहळ, डॉ. परविन सय्यद , आशा कार्यकर्त्या, ग्रा.पं.कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top