तुळजापूर , दि . ९ : 
  
तुळजापूर तालुक्यातील  दिवंगत शिक्षक सुधाकर मच्छिंद्र कांबळे यांच्या  कुटुंबियांस 3 लाख 86 हजार रुपयेचा  निधी  शिक्षक मिञानी सुपूर्द केले.


यांचे दि.14 सप्टेंबर 2021 रोजी अपघाती निधन झाले होते. कांबळे यांच्या  निधनाने त्यांच्या  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात कोणीही कमावती व्यक्ती नाही. तसेच त्यांना दोन मुले असून एक दीड वर्ष व दुसरा 5 वर्ष वयाचा आहे, तसेच सदर शिक्षकाची नेमणूक 2005 नंतरची असल्याने त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन अथवा पेन्शन अशी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार  नाही.

  म्हणूनच  शिक्षक मिञानी  कांबळे यांच्या  कुटुंबियास मदत निधी जमा करण्याचे ठरवले आणि थोड्याच दिवसात  अधिकारी व शिक्षकांनी हा निधी जमा केला. एकूण 3 लाख 86 हजार 422 रुपये मदत निधी जमा झाला. 

             
त्यापैकी 1 लाख 25 हजार दिवंगत शिक्षकाच्या आई-वडील यांच्या संयुक्त खात्यात तर 2 लाख 50 हजार निधी दिवंगत शिक्षकाची पत्नी व मुलगा यांच्या संयुक्त खात्यात पोस्टाच्या मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत जमा केला. उर्वरित 11 हजार 422 रुपये आज दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी शिक्षक मित्रांच्या उपस्थितीत कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. 


      
यावेळी शिक्षक काशीनाथ भालके, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब घेवारे, शांताराम कुंभार, तुकाराम वाडकर, बाळासाहेब चिवडे, केशव काळे, सुसेन सुरवसे, ज्योतिर्लिंग क्षीरसागर , प्रगतशील शेतकरी  श्रीराम मोरे  आदी उपस्थित होते. 

शिक्षकांच्या या सामाजिक बंधीलकीबद्दल दिवंगत शिक्षकाच्या शिक्षक मित्रांनी मदतनिधी जमा करण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले



   20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार सेवेच्या 10 वर्षाच्या आत nps/dcps धारक मृत्यू पावला तरच 10 लक्ष सानुगृह अनुदान दिले जाते अन्यथा नाही हे खूप अन्यायकारक आहे यात बदल होऊन सेवेची अट तात्काळ रद्द व्हावी,तसेच मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन तात्काळ लागू व्हावे अशी मागणी शिक्षकातुन आहे .
 
Top