तुळजापूर , दि . ९ :
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील मधुकरराव चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी निवड करण्यात आल्याचे पत्र भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी वेणुगोपाल रॉय यांनी दिले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस साठी सुनील चव्हाण यांची ही निवड अत्यंत प्रतिष्ठेची आणि पक्षाला बळकटी देणारी मानली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील युवक नेते सुनील मधुकर राव चव्हाण यांच्या निवडीनंतर राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. युवक नेते सुनील चव्हाण यांना हे पद मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदी सुनिल मधुकराव चव्हाण यांची झालेली निवड तुळजापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे मधुकरराव चव्हाण यांची राजकारणामध्ये असणारी जेष्ठता आणि पक्षांमध्ये सुनील चव्हाण अनेक वर्षांपासून सक्रिय असल्यामुळे त्यांना प्रदेश काँग्रेसकडून सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी ुनील चव्हाण यांना मिळाल्यामुळे त्यांची राजकीय उंची निश्चितपणे वाढल्याचे सिद्ध झाले आहे याचा फायदा उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला होणार आहे राज्यपाल सुनील चव्हाण यांचे सहकारी असल्यामुळे निश्चितपणे राज्यपातळीवर पक्षाला चांगले नेतृत्व देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकतेच सुनील चव्हाण यांनी अनेक वर्षापासून बंद असणाऱ्या श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असून त्यांना त्यामध्ये मोठे यश प्राप्त झाले आहे, गोकुळ शुगर या प्रतिष्ठित संस्थेकडे श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चा पदभार दिला गेल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या उसाचे गाळप करण्यासाठी हक्काचा कारखाना प्राप्त झाला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याची संधी मिळाली असून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुनील चव्हाण यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून उमरगा चे नेते बसवराज पाटील यांना यापूर्वी नियुक्ती दिली आहे त्यानंतर पाठोपाठ जिल्ह्यातील युवक नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांना प्रदेश सचिव पदी नियुक्त केल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला मोठे पाठबळ मिळणार आहे. काँग्रेस पक्षाचे आणून अनुषंगाने यांनी तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना पूर्ण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहे. त्यापाठोपाठ राज्य पातळीवर काँग्रेस पक्षाचे सचिव पद मिळाल्यामुळे सुनील चव्हाण यांची राजकीय उंची वाढली आहे.