तुळजापूर , दि .९ :
तुळजापूर पंचायत समितीकडून तालुक्यातील चाळीस शिक्षकांना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अस्मिता कांबळे , जि. प. माजी अध्यक्ष सौ अर्चना पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास प . स . सभापती रेणुका इंगोले , उपसभापती दत्तात्रय शिंदे, सदस्य चितरंजन सरडे , गट विकास अधिकारी प्रतापसिंह मरोड , गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
2019 आणि 2020 या दोन वर्षातील पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये २०१९ चे मानकरी गोविंद सीताराम कराळे, नीता बाबुराव लोखंडे, राजू मधुकर गायकवाड , राजेंद्र तात्यासाहेब नारायणकर , सचिन कुमार विश्वनाथ ढेपे , जनाबाई मुक्ताजी वाघमारे, अश्विनी वाल्मीकराव वाघमारे, दगडू सदाशिव जोडभावी, मीना सोपान बनसोडे, शंकराव विष्णुपंत तांबट, सुधीर मारुती डोलारे, बळीराम हिंदराज कोरे, दिनकर सुखदेव कदम, अनिता विठ्ठलराव जांभळे, गणेश बापू तनपुरे, २०२०चे मानकरी भाग्यश्री वसंतराव कावरे, विशाल बालाजी अंधारे, बाबू चंदू चव्हाण, सहदेव बाबुराव माळी, सुरेखा शामराव राठोड, मनोज किसनराव चौधरी, नारायण लिंबाजी वाघमारे, किसन व्यंकटराव जावळे , महादेव सिद्धलिंग स्वामी, श्रीशैल्य दया स्वामी , ज्योती देविदास वळसे, लक्ष्मण प्रभाकर कोलते, अकबर अब्बास मुलानी, उत्तरेश्वर शिवाजी पेकेकर, शिवाजी रामा राठोड या शिक्षकांना समारंभपूर्वक तालुका पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खडकीकर व विठ्ठल नरवाडे यांनी केले. याप्रसंगी विस्ताराधिकारी जी.एम .सर्जे, डॉ वाय के चव्हाण, एम एस काळे, एस एम राऊत, डी एस शिंदे, केंद्रप्रमुख ऋषिकांत भोसले, टी. आय. महाजन, ए एस स्वामी, एस डी हुंडेकरी, एस वाले, व्ही. एम. गायकवाड, सुरवसे सुभाष बलसूरे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन जाधव यांनी केले.