तुळजापूर ,दि .५:
उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गटातील किलज येथे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिवंगत माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन जाणारा पक्ष असून कॉंग्रेसच्या कार्यकाळात विविध लोकाभिमुख निर्णय व कामे करण्यात आली आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहनही यावेळी केले.
या कार्यक्रमास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज (भैय्या) पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, माजी चेअरमन सिद्रामप्पा खराडे, बालाजी बंडगर, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, माजी उपसभापती साधू मुळे, पंचायत समिती सदस्य खंडू शिंदे, तालुका उपाध्यक्ष दादा चौधरी, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, शिवराज मर्डे, अर्चना शिंदे, उपसरपंच दिक्षा गवळी, उत्तम पाटील, कंदले गुरुजी, अप्पासाहेब पाटील, अशोक राजमाने, भारत गवळी, धनाजी शिंदे, अप्पासाहेब लोखंडे, मल्लिकार्जुन येलूरे, धनंजय शिंदे, संजय भोईटे आदीसह कॉंग्रेस कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.