नवरात्र महोत्सव काळात वयोवृद्ध व लहान बालकांना प्रवेश बंदी

उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांची माहिती  

तुळजापूर , दि .६   श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय  नवरात्र महोत्सव गर्दी न करता साजरा करावा,  65 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षाखालील लहान  मुलांना दर्शन प्रवेश नसल्यामुळे त्यांनी तुळजापूर येथे येण्याचे टाळावे,.पोलीस प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत  सांगितले .

 पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मंदिर संस्थांनी दर्शनाबाबत नियमावली जाहीर केली असून त्यानुसार नागरिकांनी अंमलबजावणी करावी, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांनाच तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार आहे, नगरपरिषद ,पोलीस,आरोग्य आणि महसूल असे संयुक्त टीम ही शहर सीमा भागांवर कार्यरत असून प्रत्येक भाविकांची कसून चौकशी केल्याशिवाय शहरात प्रवेश दिला जाणार नाही.

विनाकारण नागरिकांनी गर्दी करू नये 
नागरिकांच्या सोयीसाठी पोलिस प्रशासन अहोरात्र काम करत असुन नवरात्र यात्रेमध्ये पोलीस यंत्रणेस सहकार्य करण्याचे आव्हान सई बोरे पाटील यांनी केले आहे.
 
Top